लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या रकमेतील २५ लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा रचून कारवाई करण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
Three people have been arrested in connection with drug smuggling and production.
सांगलीत मेफेड्रोन उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त, ३० कोटींचा साठा जप्त, तिघांना अटक
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त
youth attacked over parking dispute in pune
पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी, बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील घटना

बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (३४) यांचे वरळी एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. त्यासाठी बांदेकर यांनी १० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड होऊन दिड कोटी रुपये ठरले. त्या खंडणीच्या रकमेतील २५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्या वतीने हिमांश शहा (४५) आला होता.

शनिवारी रात्री भाईंदर येथील बनाना लिफ हॉटेल मध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून शहा याला अटक केली. त्यानंतर वसई येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्याचे त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांनी दिली. सर्व आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेत २०१५ ते २०२० या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते. शिवसेनेच्या बंडानंतर ते ठाकरे गटातच राहिले.

प्रकरण काय?

मुंबईत राहणारे तक्रारदार आकाश गुप्ता (३४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २०१२ पासून ते वरळी तसेच वसई विरार परिसरात बांधकाम व्यवसाय करत आहेत. गुप्ता यांच्या त्यांच्या कंपनीत हिमांशू शहा (४५) हा भागीदार आहे. गुप्ता यांची चिंतहररस चिंतपुरणी एलएलपी रिॲलर्टर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीला वरळी आदर्श नगर येथील दर्शन सोसायटीच्या पुर्नविकासाचे काम मिळाले होते. या प्रकल्पात २४० झोपडपट्टी धारक आहेत.

झोपडपट्टीधारकांना २ वर्षांचे भाडे देण्यात आले आहे. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी परवागनी मिळाली असून काम सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी या तक्रारी दिल्या होत्या. त्यावेळी तक्रारदार यांच्या कंपनीतील भागीदार हिमांशू शहा याने स्वप्नील बांदेकर याला तक्रारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले.

२२ ऑक्टोबर २०२४ रोजी माटुंगा येथील स्टार बक्स मध्ये हिमांशू शहा, किशोर आणि आकाश गुप्ता यांची पहिली बैठक झाली. त्यावेळी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिड कोटीत तडजोड झाली. तक्रारदार २५ लाख देण्यास तयार झाले. त्यातील नोव्हेंबर २०२४ आणि डिसेंबर २०२४ मध्ये दर महिल्याला २५ लाख तर जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रति महिना १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र गुप्ता पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना धमकावण्यात येत होते. अखेर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कुठला गुन्हा दाखल केला?

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८ (३) ३०८ (४), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader