लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : एका तरुणीचा बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल २२ वर्षानंतर ताब्यात घेण्यास मध्यवर्ती गुन्हे शाखे पोलिसांना यश आले आहे. विनोदकुमार पांडे उर्फ मायकल असे आरोपीचे असून तो नालासोपार्‍यात रिक्षा चालवत होता.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

२००२ साली नालासोपार्‍यात २६ वर्षीय तरुणीचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. याबाबत नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजू राठोड व धीरज गिरी या दोन आरोपीना अटक केली होती. मात्र शंकर आणि मायकल असे दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. जुन्या प्रकरणाती फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी मध्यमवर्ती गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

आणखी वाचा-नालासोपार्‍यातील औद्योगिक कंपनीवर दरोडा, सुरक्षा रक्षकाला डांबून १४ लाखांचा ऐवज लुटला

यातील विनोनदकुमार पांडे उर्फ मायकल हा आरोपी नालासोपारा येथेच रिक्षा चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून साधारण महिना भर पाळत ठेवून पोलिसांनी मायकलला ताब्यात घेतले. यात कसून चौकशी केल्यानंतर त्यांने याबाबची कबुली दिली असल्याची माहिती उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने या आरोपीला पकडण्यात यश मिळवले.