भाईंदर : राज्याच्या परिवहन कार्यालयावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्याऐवजी महापालिका स्तरावर स्वतंत्र प्रादेशिक परिवहन केंद्र उभारले जाणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ही घोषणा केली.

राज्यात जवळपास ५७ प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि ८ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयात शिकाऊ तसेच कायमस्वरूपी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि परवाना (परमिट) काढणे, त्यांचे नूतनीकरण करणे यासह वाहनांशी संबंधित विविध प्रकारची कामे केली जातात. राज्यात जिल्हा स्तरावर प्रादेशिक परिवहन केंद्र कार्यरत आहेत.

Tiwari Gram Panchayat opposes EVMs passes resolution to hold elections on ballot papers
टिवरी ग्रामपंचायतीचा इव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Uttam Jankar on Ajit Pawar
Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं
Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
cm devendra fadnavis order to confiscate assets and properties of abscond accused in sarpanch santosh deshmukh murder
फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करा : देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
maharashtra cm devendra fadnavis calls for expedited work on airport projects
राज्यातील विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

हेही वाचा >>> टिवरी ग्रामपंचायतीचा इव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर

काही ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र कामाचा आवाका प्रचंड असतो. महानगरपालिका क्षेत्रात काम सर्वाधिक कामे असल्यामुळे त्याचा ताण परिवहन विभागाच्या कामकाजावर होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी परिवहन आयुक्त विवेक भीमनवर आणि परिवहन अधिकाऱ्यांची बैठक आयोजिक केली होती. या बैठकीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील महापालिका स्तरावर स्वतंत्र कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काही दिवसांत याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातीरल सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारून संगणकीय प्रणालीवर परवाने देण्यात येतील, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी दिली.

भाईंदरमध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिवहन केंद्र

महापालिका स्तरावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी करण्याच्या घोषणेनंतर भाईंदरच्या उत्तन येथे परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेली अडीच एकर (९ हजार ७०० चौरसमीटर ) इतकी जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेचा ताबा त्वरित प्रादेशिक परिवहन विभागाकडे देण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अतिरिक्त तहसीलदार नीलेश गौड यांना दिले आहेत.

Story img Loader