वसई: विरार पश्चिमेच्या विवा महाविद्यालयाच्या समोर उभ्या करण्यात आलेल्या शालेय बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विरार पश्चिमेच्या विवा महाविद्यालया समोर शालेय मुलांना वाहतूक करणारी बस उभी करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बसचालक नेहमीप्रमाणे मुलांची  ने आण करण्यासाठी बुधवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास बस चालू करून वळण घेत असताना अचानकपणे आग लागली. या घटनेची माहिती वाहनचालकाने तातडीने  वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

वाहनात स्पार्क झाल्याने ही आग लागली होती. यात जवळच्या भागातील चार ते पाच विद्यार्थी होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून शालेय बसचे मात्र नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान तेजस पाटील, धनंजय भोईर, नितेश पाटील, अल्केश कदम, सचिन मोरे यांनी ही आग नियंत्रणात आणली.