वसई: वसई विरार शहराच्या पश्चिमेला विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यांची स्वच्छतेसाठी महापालिका व अर्नाळा ग्रामपंचायतीने समुद्र स्वच्छता यंत्र घेतली आहेत.  मात्र सद्यस्थितीत त्या यंत्रांचा वापरच होत नसल्याने ही यंत्र धूळखात पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसई विरारचा परिसर असून या परिसराला अर्नाळा, सुरुची, भुईगाव, रानगाव, नवापूर, कळंब असे समुद्र किनारे लाभले आहेत. हे समुद्र किनारे पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरत असून या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kalyan Dombivli Municipality on complaint of non collection of garbage
कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई
Environment Department approves billboards near coastal road
सागरी किनारा मार्गाजवळच्या जाहिरात फलकांना पर्यावरण विभागाची मंजुरी
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा

समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखणे स्थानिक प्रशासनासाठी मोठे जिकरीचे काम ठरत होते. मनुष्यबळाचा वापर करून विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करणे अशक्य ठरत होते.

हेही वाचा >>> सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलिसांचा सन्मान; शस्त्रसाठी जप्ती, मोबाईल नेटवर्कचा तपास सर्वोत्कृष्ट

या किनाऱ्यावर लाटांसोबत मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येत असतो तर काही वेळा पर्यटकांकडून कचरा टाकला जातो. यात प्लास्टिक व इतर प्रकारच्या कचऱ्याचा समावेश असतो. सामाजिक संस्थांच्या मदतीने अधून मधून समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम राबविली जाते. मात्र यात सातत्य राखणे अवघड असल्याने किनारे अस्वच्छ  राहत होते. या समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करता यावी यासाठी वसई विरार महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या निधींमधून समुद्र किनारा सफाई यंत्र खरेदी केले होते.

यासाठी ६७ लाख रुपये इतका निधी खर्च केला होता. तर दुसरीकडे विरारचा अर्नाळा समुद्र किनारा हा ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने अर्नाळा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने ‘ट्रॅक्टर बीच क्लिन मशीन’ दिली होती. यंत्रणेचे उदघाटन होऊन काही महिने उलटून गेले तरीही मात्र ग्रामपंचायतीकडून या यंत्राचा वापरच केला गेला नाही. त्यामुळे ही यंत्रणा अक्षरशः धूळखात पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे. लाखो रुपये खर्चून यंत्रणा घेतली त्यामुळे समुद्र किनारे स्वच्छ राहतील अशी आशा नागरिकांना होती. मात्र यंत्रणाच कार्यान्वित केली नसल्याने समुद्र किनारे कचरा व घाणीचे साम्राज्य पसरून अस्वच्छ राहू लागले आहेत असे नागरिकांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> ४१ अनधिकृत इमारती बांधणारा भूमाफिया सक्रीय; नायगाव पुन्हा बेकायदेशी चाळींचे काम सुरू

अशी होणार होती स्वच्छता

समुद्र स्वच्छता यंत्राच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार होती. यात कचरा उचलणे, त्याचे संकलन करणे, संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाळूत साचून व अडकून असलेला कचरा चाळून त्या कचऱ्याचे संकलन करणे, वाळूचे सपाटीकरण करणे यासारखी कामेही होणार होती. मात्र यंत्रणाच कार्यान्वित नाही त्यामुळे यंत्र पडून आहेत.

पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता

वसई विरार मधील समुद्र किनारे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विशेषतः विकेंडला मोठ्या संख्येने पर्यटक या भागात पर्यटनासाठी येत असतात.पर्यटकांचे आर्कषण असलेले समुद्रकिनारे सध्या घाणीच्या विळख्यात सापडत आहे. या अस्वच्छतेमुळे येथील पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंत्र चालविली जात असल्याचा प्रशासनाचा दावा समुद्र किनारा सफाई यंत्र चालविली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.राजोडी व सुरुची अशा दोन्ही समुद्र किनाऱ्यावर अधूनमधून स्वच्छता केली जात असल्याचे महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे.तर अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर ही यंत्र चालविले जाते. मात्र मनुष्यबळ नसल्याने अडचणी येत आहेत.त्यामुळे १५ दिवसातून एकदा आम्ही स्वच्छता करतो असे अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन राणे यांनी सांगितले आहे.

Story img Loader