लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेले सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जाऊ लागला आहे. त्यामुळे हे रस्ते गिळंकृत होऊ लागले आहे. याचा आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग दळणवळणासाठी एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. महामार्गावर ठिकठिकाणी सेवा रस्ते तयार केले आहेत. ते ही सुद्धा अपुरेच आहेत.  वसई विरारच्या भागात खानिवडे, चिंचोटी , बापाणे फाटा, पेल्हार, नालासोपारा फाटा, अशा ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सेवा रस्ते तयार केले आहेत. 

आणखी वाचा-महामार्गाच्या काँक्रीटीकरणाला विलंब, केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनाला महिना उलटल्यानंतरही कामास सुरुवात नाही

या सेवा रस्त्यांचा वापर विश्रांतीसाठी, बाजूबाजूच्या गावांना ये जा करण्यासाठी व आपत्कालीन परिस्थितीत वाट काढता यावी यासाठी केला जात होता. आता मात्र या सेवा रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागातील कचरा, राडारोडा छुप्या मार्गाने आणून टाकण्याचे प्रकार घडू लागले आहेत.त्यामुळे सेवा रस्ते पूर्णतः बंद होऊ लागले आहेत. त्या ठिकाणाहून वाहन ही जाऊ शकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या साऱ्या घडणाऱ्या प्रकाराकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सुरवातीला केवळ रस्त्याच्या कडेला हा राडारोडा टाकला जात होता आता तर थेट रस्त्यावरच टाकला जात असल्याने ये जा करण्यास अडचणी येतात. छुप्या मार्गाने कचरा व राडा रोडा टाकत आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आणखी वाचा-वसई : अवकाळीने नुकसान झालेल्या ३४७ ग्रस्तांचे पंचनामे

सेवा रस्ते अपुरेच

मुंबई अहमदा महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते तलासरी या दरम्यान सुमारे ६० किलोमीटर पर्यंत सेवा रस्ते तयार करण्यात येणार होते. त्यापैकी काही भागात सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र इतर ठिकाणी सेवा रस्ता बनविण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने अखेर ६० किलोमीटर सेवा रस्ता विकास आरखड्यातून रद्द करावा लागला. त्यामुळे महामार्गावरील सेवा रस्ते अपुरेच राहिले आहेत.

वाहने थेट मुख्य रस्त्यावर

सेवा रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्याने सेवा रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे लांब पल्याच्या ठिकाणी प्रवास करणारी अवजड वाहने ही थेट मुख्य रस्त्यावर उभी राहू लागली आहेत. त्यामुळे मुख्य रस्ता अरुंद होऊन वाहतूकिला अडथळे निर्माण होत आहेत.