वसई : Mira Road Murder Case मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (३२) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकर मध्ये शिजवले आणि गॅसवर भाजले. नंतर ते तुकडे बकेट आणि टब मध्ये ठेवल्याचे आढळले.

मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले.

Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Baba Siddique murder case Zeeshan Siddique statement
Baba Siddique Murder Case : झिशान सिद्दिकींच्या जबाबात १० बिल्डर व ‘त्या’ दोन नेत्यांची नावं, पोलीस कारवाई करणार?
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
boy studying in class 10 killed his father with help of his mother in Hudkeshwar police station limits
गृहमंत्र्यांच्या शहरातील हत्याकांडाचे सत्र थांबता थांबेना, मुलाने आईच्या मदतीने केला वडिलाचा खून; मृतदेह पोत्यात भरुन…

हेही वाचा >>> मीरा रोड मध्ये तरुणीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून लावली विल्हेवाट

सुरवातीला पोलिसांना तिचे पाय आढळले. धड आणि शीर नव्हते. त्याचा शोध घेतला असता घरातच ते कापून बकेट आणि पातेल्यात ठेवले होते. आरोपी साने याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. ते कुकर मध्ये शिवजले आणि गॅसवर भाजले होते. पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने ते घरातील पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ५ दिवसांपूर्वी साने याने ही हत्या केल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

सुञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज सानेला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद  व्हायचा. अश्याच एका वादानंतर तीन दिवसापूर्वी सरस्वतीने विष पिऊन घरातच आपले जीवन संपवले होते.यामुळे तिच्या मृत्यूस आपण कारणीभूत ठरणार असल्याची भीती मनोज याला वाटू  लागली होती.त्यामुळे मृत शरीराची परस्पर  विल्हेवाट लावण्यास त्याने सुरुवात केली.यात त्याने कटरच्या वापराने तिच्या शरीराचे  तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवले. त्यानंतर त्यांना भाजून ते मिक्सरच्या मदतीने बारीक केले.तो राहत असलेल्या सोसायटीच्या मागील गटारात त्याने हे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्याने वापरलेले साहित्य आणि बाईक  पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Story img Loader