श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आज या प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाची नार्को चाचणी केली जाणार आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये श्रद्धा आणि आफताबच्या नात्यामध्ये अनेकदा हिंसक मारहाणीच्या घटना घडल्याचे पुरावे या दोघांशी संबंधित व्यक्ती, डिजीटल संवादांवरुन सापडले आहेत. आफताबने यापूर्वीही श्रद्धाला २०२० साली मारहाण केल्याचे चॅट सध्या चर्चेत आहेत. मात्र असं असतानाही श्रद्धा आफताबबरोबर का राहत होती असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. असं असतानाच श्रद्धाची निकटवर्तीय असलेल्या पूनम बिर्लनने श्रद्धा आणि आफताबचं नातं कसं होतं यासंदर्भात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

नालासोपाऱ्यात राहणाऱ्या पूनमने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, “श्रद्धा एकदा माझ्याकडे कपाळावर, गालावर आणि गळ्यावर जखमा असलेल्या आवस्थेत आली होती” असा दावा केला आहे. तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाल्याचं तिच्या मानेवरील खुणांवरुन समजत होतं असंही पूनम म्हणाली. “यासंदर्भात आपण श्रद्धाकडे चौकशी केली असता तिने आफताबने मारहाण केली आणि गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याने आपण पळून आल्याचं मला सांगितलं,” असं पूनमने म्हटलं आहे. “ती पळून आली नसती तर त्याने तिला मारुन टाकलं असतं” असा दावा पूनमने केला आहे. विशेष म्हणजे श्रद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न ज्या गोष्टीमुळे झाला ती अधिक धक्कादायक असल्याचं पूनम सांगते.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

“त्या दिवशी झालेल्या वादाचं कारण फारच धक्कादायक होतं. आफताबने श्रद्धाला बेदम मारहाण केली कारण तिने मांसाहार करण्यास नकार दिला. श्रद्धाने मांस खाण्यास नकार दिल्याने आफताब संतापला. तो अनेकदा दिला मांस खाण्यासाठी बळजबरी करायचा. मात्र ती मांस खायची नाही. त्यावेळी आफताब तिला मारहाण करायचा,” असं पूनम म्हणाली. तसेच पुनमने श्रद्धाला यावेळी आधार दिल्याचं सांगताना आफताब आणि श्रद्धा ही दोन टोकाची व्यक्तीमत्वं होती असंही म्हटलं आहे. तो वेगळ्या धर्माचा असल्याने त्याच्या पालकांचाही या नात्याला विरोध होता. तो तिला कारण नसताना मारहाण करायचा. मग तरी ती त्याच्याबरोबर कशी राहायची हा प्रश्नच आहे, असंही पूनम म्हणाली.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु

पूनमने दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाने अनेकदा आफताबविरोधात तक्रार करण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळी आफताबचे पालक घरी येऊन तिची समजून घालायचे आणि आफताबला माफ करण्यासाठी विनंती करायचे. ते तिच्याशी भावनिक होऊन संवाद साधायचे की ती आधीचं सगळं विसरुन जायची आणि आफताबविरोधात तक्रार करणं टाळायची. श्रद्धाने आफताबच्या पालकांचं म्हणणं ऐकलं नसतं तर आज ती जिवंत असती असंही पूनमने सांगितलं. आफताबला त्याच्या पालाकांचं पूर्ण समर्थन होतं असाही दावा पूनमने केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case aftab poonawala used to force shraddha to eat non veg beat her if she refuse parents also supported scsg