भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकरीता ३० बस खरेदी करण्याचा निर्णय  महासभेत घेण्यात आला आहे. बस खरेदीनंतर यातील पाच बसगाडय़ा या केवळ महिला विशेष म्हणून धावणार असल्याचे महासभेत ठरवण्यात आले आहे.

शहराची भविष्याची गरज पाहता यात वाढ करण्याचा सल्ला केंद्र शासनाच्या परिवहन सल्लगार समितीने  प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार अतिरिक्त ३० मिडीबस खरेदी करण्याचा निर्णय गुरुवारी  घेण्यात आला आहे.  निर्णय घेत असतानाच भाजप नगरसेविका वर्षां भानुशाली यांनी या बसमध्ये ५ बस या महिलांकरिता आरक्षित ठेवण्याची सूचना केली. त्या बसवर आतील आणि बाहेरील बाजूस ‘महिला विशेष’असे  करण्याचे त्यांनी सांगितले. या सूचनेची महापौरांनी विशेष दखल घेत यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मत मांडण्यास सांगितले. त्यानुसार ही सूचना शहर हिताकरिता असल्याचे नमूद करत लवकरच, महिला विशेष बस सेवा सुरू करण्यात येईल असे महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांनी महासभेत स्पष्ट केले.