लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : विरारच्या मनवेलपाडा तलावात डॉ बाबासाहेब आंबंडकरांचा पुतळा उभारण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी उभारलेला मनवेलपाडा नाक्यावरील डॉ आंबेडकरांचा पुतळा हटवू नये आणि आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये असे निर्देशही त्यांनी दिले.

Atul Vandile nominated from Hinganghat and Three candidates from Teli community in Wardha
हिंगणघाटमधून आघाडीचे अतुल वांदिले, तैलिक संघटनेच्या प्रभावाने वर्धा जिल्ह्यात तीन उमेदवार
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Ashok Chavan daughter, Tirupati Kadam, Bhokar,
भोकरममध्ये अशोक चव्हाणांच्या कन्येला तिरुपती कदमांचे आव्हान
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
Chandrakant Patil will file his nomination form from Kothrud Assembly Constituency
२४ तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल; चंद्रकांत पाटील
Diwali is in next week There will be various events in sky as well
दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :  प्रक्रिया धुडकावून अधिसूचना

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा तलावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी २०१८ पासून पालिकेकडे करण्यात येत होती. परंतु पालिकेने आश्वासन देऊनही मागणी पूर्ण केली नाही आणि तलावाचे सुभोभिकरण केले. यामुळे विविध पक्ष आणि संघटनेतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तलावासमोरील चौकात बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा उभारला. जो पर्यंत तलावात पुतळा उभारला जात नाही तो पर्यंत नाक्यावरील अर्धाकृती पुतळा हटवला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

आणखी वाचा-वसई: मालमत्ताकराचे सर्वेक्षण करणार्‍या एजन्सीकडून लूट, हितेंद्र ठाकूरांकडून एजन्सी काढून टाकण्याचे निर्देश

या वादात्या पार्श्वभमीवर संविधान कृती समितीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कायदेशीर बाबी तपासून मनवेल पाडा तलावात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी पु निर्देश त्यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले. पुतळा आंदोलनकर्त्यांवर कुठलेही गुन्हे दाखल न करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले. तलावात पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत नाक्यावरील पुतळा हटवला जाणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

मनवेलपाडा तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी संविधान कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.