बारावीच्या निकालात ९० टक्के न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. तिला ७८% मिळाल्याने ती निराश होती. अनुष्का मेहरबानसिंह कबचुरी(१७)असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती यंदा बारावीच्या वाणिज्य ( कॉमर्स ) शाखेतून परीक्षेत बसली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वसई:जिवंत महिला मतदान केंद्रावर ठरली ‘मयत’

अनुष्का हुशार विद्यार्थिनी होते तिला बारावी मध्ये  ९०% पेक्षा जास्त गुण मिळतील अशी अपेक्षा होती मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ७८ टक्के गुण मिळाले.मात्र ९० टक्क्याहून अधिक गुणांची अपेक्षा असताना  कमी गुण मिळाल्याने ती नैराश्यात गेली होती.परिणामी दुपारी घरात कोणीही नसताना नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेत तिने आत्महत्या केली, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली.