वसई : आधी अभ्यासाचा आणि परीक्षेचा तणाव, त्यानंतर निकालाची धाकधूक आणि अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने येणारे नैराश्य… विद्यार्थीदशेतील ही जीवनशैली विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून १० वी आणि १२ वीच्या निकालानंतर राज्यात १८ हून अधिक विद्यार्थांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. असे असताना विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी शिक्षण विभागामार्फत उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.

शिक्षण क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे व समाजमानसातील चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. यामुळे विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्याच्या विविध भागांत १० वी-१२ वीचे निकाल लागल्यापासून किमान १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात काही ९ वीमधील विद्यार्थीही आहेत. राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे विद्यार्थ्यांचा तणाव दूर करून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी ४१० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या समुपदेशकांची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचत नाही. संकेतस्थळावरही सहजगत्या समुपदेशकांची माहिती मिळत नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून सरकारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिक्षणक्षेत्रातून होत आहे. महेंद्र गौरीकुमार बैसाणे ऊर्फ भारुकाका हे सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात या मागण्यांसाठी त्यांनी आझाद मैदानात उपोषणही केले होते. फेब्रुवारीमध्ये शालेय शिक्षण विभागाने पत्र पाठवून राज्य शैक्षणिक परिषदेच्या संचालकांकडून मागवलेला खुलासा अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही. या निकालांच्या पार्श्वभूमीवर उचित समुपदेशनाची तसेच आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. वसई आणि भाईंदरमध्ये यंदा निकालानंतर ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी गुण मिळाल्याने ३ विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्या. तर ९ वीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>वसईत दोन मुलांचा बुडून मृत्यू, अन्य मुलांचा शोध सुरू

१० वी, १२ वीच्या निकालानंतर यंदा राज्यातील १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या रोखण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई महानगरात सर्वाधिक आत्महत्या

यंदा १० वी, १२वीच्या निकालानंतर मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मिळून सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे. त्याखालोखाल चार, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात प्रत्येकी तीन, मराठवाडा आणि कोकणात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने निकालानंतर जीवन संपविले आहे.

विद्यार्थ्यांना असलेला तणाव आणि आत्महत्यांबाबत शिक्षण मंडळ, शालेय शिक्षण विभाग यांना या धोक्याची कल्पना देऊनही काही उपाययोजना केलेल्या नाहीत.– महेंद्र बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते

Story img Loader