वसई: विरार जवळील अर्नाळा समुद्रात बेकायदेशीर वाळू उपसा करताना बोट उलटली असल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात असलेल्या १२ मजुरांपैकी एक मजूर अजूनही बेपत्ता आहे. त्याचा हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोध सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, वसईत दोन अपघातांत तिघांचा मृत्यू

हेही वाचा – वसईच्या शार्वी महंतेला १०० टक्के गुण

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा व अर्नाळा किल्ला परिसर आहे. या भागात वाळू उपसा करण्यासाठी बंदी असतानासुद्धा छुप्या मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने वाळू उपसा करण्यासाठी बोट निघाली होती. यात १२ मजूर होते. मात्र अर्ध्यावर गेल्यानंतर अचानकपणे ही बोट उलटली. यात ११ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील एक मजूर बेपत्ता आहे. त्याचा शोध अर्नाळा पोलिसांच्या मार्फत सुरू आहे. मात्र अजूनही त्याचा शोध न लागल्याने हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.