विरार : नालासोपारा येथे वसई विरार महापालिकेच्या परिवनह सेवेला शुक्रावरी दुपारी अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली. अग्नीशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता नालासोपारा स्थानकातून वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची बस (एमएच ४७ ६३२०) ही महामार्गावर जात होती. या बसमध्ये एकूण १५ प्रवासी होती.
बस नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग परिसरातून जात असातना अचानक इंजिन मधून ठिणग्या पडू लागल्या. बसचालक शिवम चव्हाण याने प्रसंगावधान दाखवून बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर जायला सांगितले. इतक्यात बसने पेट घेतला. मात्र तो पर्यंत प्रवासी बस मधून उतल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत बस पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.