भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथील वसाहतीला “बांगलादेश” नाव देण्यात आल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ताने’ प्रसिद्ध करतात समाजातील सर्व स्तरातून
जनक्षोभ उसळला आहे. शनिवारी रात्री संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी बांगलादेश नाव असलेल्या बस थांब्याच्या फलकाला काळे फासले आणि हा फलक काढून फेकला

उत्तन परिसरात असलेल्या इंदिरानगर वसाहतीचे नामकरण करून बांगलादेश वसाहत करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने शनिवारी प्रसिद्ध केले. या बातमीनंतर एकच खळबळ उडाली होती. ‘बांगलादेश’ नामकरण करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यामुळे शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या परिवहन थांब्याच्या फलकाला काळे फासले तसेच बांगलादेश नाव असलेला बस थांबाच काढून फेकला. आपल्या देशात बेकायदेशीरपणे देण्यात आलेले बांगलादेश हे नाव खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी दिला

Story img Loader