भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची निविदा तिसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वेळी पूर्वीच्या अटी-शर्तीत बदल करून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार ११ नोव्हेंबरनंतर कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेत मोठय़ा ५९, मध्यम १० बस, तर वोल्वोच्या ५ वातानुकूलित अशा एकूण ७४ बस आहेत. या बसगाडय़ा तात्पुरत्या स्वरूपात चालवण्यासाठी पालिकेने एनसीसी आणि व्हीजीएफ तत्त्वावर एका खासगी कंत्राटी कंपनीला कंत्राट दिले आहे. त्याअंतर्गत कंत्राटदाराला तिकिटाचे पैसे जमा करण्याचे अधिकार देण्यात येतात. मागील काही वर्षांत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध बसगाडय़ा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या ८ कोटींच्या निधीतून १७ इलेक्ट्रिक बस केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा