सुहास बिर्हाडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहरातील वाहूतक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेले वाहतूक धोरण केवळ कागदोपत्रीच राहिले आहे. ते लागू करण्यासंदर्भात महापालिकांची उदासिनता दिसून येत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे. दुसरीकडे शहराच्या रस्त्यांवर दररोज सरासरी २०० नव्या वाहनांची भर पडत आहे
वसई विरार तसेच मीरा भाईंदर शहरात अरुंद रस्ते असून वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यावर वाहनांच्या सकाळ संध्याकाळ रांगा लागलेल्या असतात तर काही ठिकाणी वाहने मध्येच उभी केली जात असल्याने नागरिकांच्या रहदारीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. तर दुसरीकडे वाहने उभी करण्याची जागा निश्चित नसल्याने वाहनधारकांनी वाहने लावायची असा प्रश्न पडतो. रेल्वे स्थानक, बाजारपेठा, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी नागरिकांना वारंवार जावे लागते. तेथे वाहने उभी केली तर वाहतूक पोलीस ती उचलून नेतात आणि ते सोडविण्यासाठी वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. मीरा भाईंदर, वसई विरार शहरात नव्या वाहनांची संख्या देखील वाढत आहे. या वाढत्या वाहनांचा भार रस्त्यावर पडत असतो. त्यामुळे वाहतूक नियोजन करणे कठीण होऊन बसले.
हेही वाचा >>>वसई-विरार : जात पंचायच बरखास्त, दहशत मात्र कायम; दंड परत केलाच नाही, ग्रामस्थांवर गुंडगिरी सुरू
वाहतूक कोंडी, वाहनतळ प्रश्न अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे वाहतूक धोरण निश्चित कऱण्यात आले होते. त्यासाठी शहराचे सर्वेक्षण, वाहतूक समस्या आदींचा अभ्यास करण्यात आला होता. या वाहतूक धोरणात अती गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर, बाजार पेठा, ये-जा करण्याचे मुख्य मार्ग, रुग्णालये, शाळा महाविद्यालयीन परिसर अशा भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करून सविस्तर आराखडा तयार करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये हा आराखडा प्रसिध्द करण्यात आला होता. या आराखड्यानुसरा मीरा भाईंदर मध्ये ५७ ठिकाणी, वसईत १०६ , विरार १०९ अशी एकूण २७२ ठिकाणे ही पार्किंग नो पार्किंग साठी निश्चित करण्यात आली आहेत. ९ ठिकाणी एक दिशा मार्गिका व २ ठिकाणी अवजड वाहनांना विशिष्ट वेळेसाठी प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच सम आणि विषम अशा तारखेनुसार सुद्धा वाहतूक नियोजन करण्यात आले होते. प्रथमच अशा प्रकारचा वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता.
वाहतूक धोरण लागू केल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती व्यर्थ ठरली आहे. मुळात वाहतूक धोरण तयार करताना त्याची व्यापक प्रसिध्दी करण्यात आली नव्हती. इतर घटकांना सामावून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे ते प्रसिध्द केल्यानंतर केवळ ७ हरकती आल्या होत्या. तरी यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिसूचना काढून १५ दिवसांत वाहनतळांची (पार्किंगची) ठिकाणे निश्चित केली जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महापालिकेकडून अद्याप काहीही कामे करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा आराखडा राबविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ४ महिने उलटूनही हे वाहतूक धोरण लागू झालेले. यासाठी महापालिकेची उदासिनता असल्याचे पोलीस सांगत आहेत. आम्ही आमची भूमिका पार पाडली आहे, आता महापालिकेने या ठिकाणांवर चिन्हे आणि फलके लावायची आहेत असे सांगून पोलिसांनी हात वर केले आहेत. आराखड्यानुसार वाहने कुठे उभी करायची, कुठे उभी करून नयेत आदी ठिकाणे निश्चिच करण्यात आली होती. त्यासंदर्भात फलके लावणे आवश्यक होती. मात्र वसई विरार तसेच मीरा भाईंदर महाालिकांनी अशी फलके तयार केेलेली नाहीत. इतकी प्राथमिक कामे जर होत नसतील तर पुढे हे धोरण योग्य प्रकारे राबविले जाईल की नाही यावर देखील शंका आहे. पालिकेला शासनाकडून सतत विविध मोहिमा राबविण्यास सांगण्यात येत आहे. पालिकेच्या यंत्रणा त्यात व्यस्त आहेत. परिणामी अशी विधायक कामे करता येत नाहीत, असे पालिका अधिकारी खासगीत सांगतात.
हेही वाचा >>>वसई : प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाई, सिमेंट काँक्रीट प्रकल्प बंद करण्याचे आदेश; सहा प्रकल्पांना नोटीस
कारण काहीही असले तरी याचा फटका शेवटी सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असतो. पालिकेच्या विकास आराखड्यातील वाहनतळासाठी असलेले राखीव भूखंड गिळंकृत करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहने उभी कऱण्यासाठी जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. परिणामी वाहने रस्त्यात बेशिस्तपणे लावली जात आहे. वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने अनेकदा वाहने टोइंग होतात याचा आर्थिक फटका नागरिकांना बसतो. काही वेळा नागरिक आणि वाहतूक पोलीस यांच्यात खटके उडत असतात.एकीककडे अरूंद रस्ते, त्यावरील अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत असताना वाहनांची देखील भर पडत आहे. वसई विरार शहरात २०२३ या वर्षात ८० हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. म्हणजे दिवसाला सरासरी २०० वाहने रस्त्यावर येत असतात. २०२१ मध्ये ५७ हजार ४३०, २०२२ मध्ये ७१ हजार ९५६ आणि २०२३ मध्ये ८२ हजार ३५७ एवढी वाहने रस्त्यावर आली आहेत. नवीन वाहने वाढत असतान जुनी झालेली वाहने भंगारात काढण्याचे प्रमाण कमी आहे. अशी बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला जागा अडवून उभी आहेत.
हे वर्ष निवडणुकांचे आहे. आचारसंहिता आणि निवडणुकांच्या कामात शासकीय यंत्रणा व्यस्त असणार आहेत. त्यामुळे वाहतूक धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते. यासाठी आता पालिका आणि पोलिसांनी समन्वयन साधून वाहतूक धोरणासाठी प्राथमिक कामे करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.