वसई- मध्यरात्री पार्टी करून घरी परतणारा एक तरुण… तो मद्यधुंद अवस्थेत असताना त्याच्यावर हल्ला करून लुटण्यात आले. तरुण नशेत असताना त्याला काही आठवत नव्हतं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून ज्यांना ज्यांना पकडलं ते चोर नव्हते. मग खरा चोर कोण होता…?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नालासोपारा येथे राहणारा विनय चौरसिया (२८) हा तरुण आपल्या दोन मैत्रिणांना घेऊन आचोळे पोलीस ठाण्यात एक विचित्र तक्रार घेऊन आला होता. नववर्षाची पार्टी साजरी करून तो घरी परतत होता. त्याने मद्यपान केले होते. तो आचोळे क्रॉस रोड येथील बस थांब्याजवळ बसला होता. मद्याच्या नशेत असल्याने पुढे काय झाले ते आठवत नव्हते. या काळात कुणीतरी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्याकडील अंगठी, हातातील कडे, रोकड तसेच मोबाईल फोन चोरून नेला होता. प्रकरण गंभीर असल्याने आचोळे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा – वसई : आता पोलीसही बोलणार फाडफाड इंग्रजी, पोलीस ठाण्यात भरतेय ‘इंग्रजीची शाळा’
आचोळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी एक तरुण त्याच्याशी बोलत वाद घालत असलेला दिसला. चौरसिया याने त्याला ओळखले. तो त्याचा मित्र मयंक चौहान (१८) होता. मयंकनेच माझ्यावर हल्ला करून चोरी केल्याचे चौरसियाने पोलिसांना सांगितले. आचोळे पोलिसांनी मग मयंक चौहान याला अटक केली. रात्री चौरसिया मद्याच्या नशेत होता. तो मला भेटला पण मी चोरी केली नाही, असा दावा त्याने केला. त्यामुळे पोलिसांनी घटनेच्या आधीचे सीसीटीव्ही तपासले त्यावेळी हल्ला करणारा संशयीत दिसून आला. आता खरा चोर सापडला असे पोलिसांना वाटले होते.
हेही वाचा – वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
तो मी नव्हेच…
अखेर हल्ला करणार्या संशयिताला पोलिसांनी शोधून पकडले. मात्र सीसीटीव्हीत दिसणारा ‘तो मी नव्हेच’ असा दावा त्याने केला. त्यामुळे पोलीस बुचकळ्यात पडले. सीसीटीव्हीत चोरी करताना दिसतो पण प्रत्यक्षात तो नाही अशी अजब परिस्थिती होती. अखेर चौकशीत उलगडा झाला. चोरी करणारा खरा चोर त्या संशयित इसमाचा जुळा भाऊ होता. मग पोलिसांनी तपास करून खर्या चोराच्या मुसक्या आवळल्या. लव सरोज आणि करण दंतांनी यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक यशपाल सुर्यवंशी यांच्या पथकाने हा तपास केला.