वसई: वाहनांची बॅटरी काढून चोरणाऱ्या एका अवलिया चोराला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. किरण गिऱ्हाणे असे या आरोपीचे नाव आहे… त्याला दोन बायका असून एक प्रेयसी आहे. या तिघींचा खर्च भागवण्यासाठी तो चोर बनल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. महामार्गावर उभे असलेले ट्रक, हॉटेलबाहेर उभी असलेली वाहने वाहनतळावर उभ्या असलेल्या गाड्या यांच्या बॅटऱ्या चोरी करण्यात येत होत्या. यामुळे वाहन चालकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा-३ च्या पथकाकडून करण्यात येत होता.

गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून विक्रमगड तालुक्याततून किरण गिऱ्हाणे याला अटक केली. त्याच्याकडून मांडवी, वालीव, पेल्हार आदी पोलीस ठाण्यामध्ये बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले की, आरोपी किरण गिऱ्हाणे याच्या दोन बायका आहेत तसेच त्याची एक प्रेयसी आहे. त्यामुळे तिघांचा खर्च करता करता त्याच्या नाकी नऊ यायचे. या तिघींचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीच्या मार्ग पत्करला. एका वाहनांमधील बॅटरी भंगारात विकली तर त्याचे त्याला २ हजार रुपये मिळायचे.  त्यामुळे त्यांनी बॅटरी चोरी करण्यास सुरुवात केली.तो आपल्या वाहनाने वसई, विरार परिसरात यायचा. ज्या वाहनातील बॅटरी चोरायची असेल त्याच्या बाजूला आपले वाहन उभे करायचा.