लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी माणिकूपर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील हा तिसरा गुन्हा आहे.

विरार पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. शुक्रवारी माणिकपूर पोलिसांनी उमेळमान येथे बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ या अनधिकृत इमारत प्रकरणी ६ जणांविरोधात फसवणूक, बनवाट कागदपत्रे तयार करणे तसेच एमआरटीपीए कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जागा मालक दिपेश म्हात्रे, विकासक संदीप लांडगे तसेच मयूर एण्टरप्रायझेसचा मालक मच्छिंद्र व्हनमाने, दिलीप अडखळे, प्रशांत पाटील आणि देवेंद्र मांजी यांचा समावेश आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकाची फसवणूक करून कर्जे घेतल्याचाही आरोप आहे.

आणखी वाचा-‘कार्यालयात येऊन फटकावेन..!’ हितेंद्र ठाकूर यांची वसई पालिका आयुक्तांना दमदाटी

श्री स्वामी समर्थ ही चार मजली अनधिकृत इमारत आहे. त्यांनी पालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून ही अनधिकृत इमारत तयार केल्याची माहिती मिळताच आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती नवघर माणिकूपर (प्रभाग समिची एच) चे प्रभारी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी दिली. आम्ही ६ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.

५५ अनधिकृत इमारत प्रकरणी पहिला गुन्हा विरार मधील रुंद्राश इमारतीचा जागामालक आणि विकासकांवर तर दुसरा गुन्हा विरार ममधील गुरूकृपा अपार्टमेंटच्या जागा मालक आणि विकासकांवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.