लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई : १५ वर्षांची तीन शाळकरी मुले रडत विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात आली. ‘पोलीस काका आमची सायकल चोरीला गेलीय.. आई-बाब ओरडतील, मारतील… प्लीज आमची सायकल शोधून द्या अशी विनंती केली. हे सांगताना एक मुलगा पोलीस ठाण्यातच ओक्साबोक्सी रडायला लागला. सायकल चोरीला गेल्याने मुलांची झालेली अगतिकता पाहून उपस्थित पोलीसही हळहळले.. पोलिसांनी त्या चिमुकल्याच्या तक्रारीची दखल घेऊन इतर कामे सोडली आणि सायकल शोधायला सुरवात केली. अवघ्या दोन दिवसात चोरी करण्यात आलेल्या तब्बल १३ सायकली जप्त केल्या आणि २ सायकर चोरांना गजाआड केले.
शनिवार १४ डिसेंबर रोजी विरार पश्चिमेच्या गावठाणी येथील एका खासगी क्लास मध्ये मुले नेहमीप्रमाणे शिकवणी साठी गेली होती. संध्याकाळी तीन मुलांना क्लास खाली ठेवलेली सायकल आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही सायकल मिळाली नसल्याने मुले रडवेली झाली होती. एका मुलाची सायकल फायरफॉक्स कंपनीची २५ हजारांची सायकल होती तर अन्य दोन मुलांच्या सायकली प्रत्येकी १० हजार रुपये किंमतीच्या होत्या. या मुलांनी मग बोळीज पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे आणि पोलीस हवालदार किशोर धनू उपस्थित होते. सायकली चोरील्या गेल्याने मुले भेदरली होती. त्यापैकी एका मुलाला रडू फुटले. त्याची यापूर्वी दोन वेळा सायकल चोरीला गेली होती. पोलीस काका आमची सायकल शोधून द्या नाहीतर आई बाबा मारतील असे सांगत या मुलाने पोलिसांना आर्जवी विनंती केली.
आणखी वाचा-मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई
पोलिसांनी मुलांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरवात केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सनी प्रजापती (२६) आणि गौरव साळवी (२४) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनी चोरलेल्या या तिन्ही मुलांच्या सायकली हस्तगत केल्या याशिवाय याच परिसरातून आठवड्याभरात चोरलेल्या १३ सायकलीही परत मिळवल्या. आपली चोरीला गेलेली सायकल परत मिळाल्याचे पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आरोपी हे नशेबाज असून नशेसाठी सायकल चोरत होते. अवघ्या १ ते २ हजारात त्यांनी या सायकली विकल्या होत्या, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे यांनी दिली.