वसई: आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शाळांमध्ये आरटीई  अंतर्गत२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसईतील १५३ शाळात ३ हजार ६३७ इतक्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक आणि दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्याला खासगी शाळांमधील २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वसई तालुक्यात  १४  ते २७ जानेवारी या दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

हेही वाचा >>>वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प

वसईत ३  हजार ६३७ जागा राखीव आहेतयात वसई विरार मधील १५३ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत

तसेच मुदत संपल्यावर संचालक राज्यस्तरावर संपूर्ण राज्याची ऑनलाईन लॉटरी काढण्यात येईल व त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचे प्रवेश अंतिम करण्यात येतील अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अर्ज भरताना काही अडचणी असल्या शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास

अर्ज भरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

आरटीईचे अर्ज दाखल करताना अनेकदा कागदपत्रांची कमतरता तर कधी योग्य माहिती भरली जात नसल्याने पालकांचे अर्ज पुढे जात नाहीत. यासाठी आधीच पालकांनी याची पूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरावा. याशिवाय आधार कार्ड, निवासी दाखला, जात प्रमाणपत्र, उत्त्पन्न दाखला, १० शाळांची निवड यासह अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे यांची पुर्तता करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. याची माहिती पंचायत समितीच्या संकेतस्थळावर ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अर्ज भरताना ही विशेष लक्ष द्यावे जेणेकरून पुढे काही अडचणी येणार नाहीत – माधुरी पाटोळे, गटशिक्षणाधिकारी वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three and a half thousand seats reserved in 153 schools for rte admission in vasai news amy