विरार : वसई-विरार परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी विरार, वालीव, आणि तुळींज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर बलात्कार झाले आहेत. यातील विरार येथील घटनेत पीडिताही सध्या १८ वर्षांची असून पाच महिन्यांची गरोदर आहे. मागील पाच वर्षांपासून तिच्याच चाळीतील इसम तिच्यावर अत्याचार करत होता.
विरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वालिव पोलीस ठाण्यातील घटनेत एका १७ वर्षीय मुलीला तिच्याच परिसरातील एका इसमाने शाळेत सोडण्याच्या बहाणे तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातही वालीव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
तुळींज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश येथे पळवून नेले आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. नंतर तिला पुन्हा नालासोपारा येथे आणून सोडून दिले आणि पसार झाला. या तीनही घटना सोमवारी दाखल करण्यात आल्या. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.