लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
Vasai Crime : पगार मिळत नाही म्हणून अनेक लोक मालकाशी भांडतात. पगार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. मात्र वसईतील एका कंपनीत काम करणाऱ्या तीन तरुणींनी एक अजब शक्कल लढवली होती. या तरुणींनी आपल्यापाण्याच्या बाटलीत मालकाने लघुशंका भरून दिल्याची तक्रार ( Vasai Crime ) पोलीस ठाण्यात केली. सुरुवातीला पोलीस देखील या अजब आरोपाने चक्रावले होते मात्र पोलीस तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले.
इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यात घडली घटना
वसई पूर्वेच्या नवघर येथे इमिटेशन ज्वेलरी बनाविन्याचा एक छोटा कारखाना आहे. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या तीन तरुणींनी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये एक अजब तक्रार दाखल केली. आमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कंपनी मालकाने लघुशंका केल्याचा खळबळजनक आरोप ( Vasai Crime ) त्यांनी या तक्रारीत केला होता. या विचित्र आरोपाने पोलीस देखील चक्रावले.
पोलिसांनी लगेच कंपनीमध्ये चौकशी सुरू केली रात्रपाळीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना आणले त्यांची कसून चौकशी सुरू केली. त्यांना पोलिसी भाषेत ‘प्रसादही’ दिला मात्र कोणीच कबुली कबुली देईना. ( Vasai Crime ) कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरे देखील नव्हते त्यामुळे नेमका काय घडलं हे कळायला मार्ग नव्हता.
मुलींचा नेमका आरोप काय?
इमिटेशन सगळा किळसवाणा प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप या मुलींनी केला होता. याची तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली असता त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतला होता. त्यानंतर संतापलेल्या त्या मुलींनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली लेखी तक्रार पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी जेव्हा या मुलींची उलट तपासणी केली तेव्हा घडलेला प्रकार समोर आला.
तीन तरुणींची उलट तपासणी केल्यावर प्रकार समोर
काहीही समोर येत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या तीन तरुणीची उलट चौकशी केली. तेव्हा त्यांनी हा बनाव रचल्याची बाब समोर आली. स्पष्ट झाले. कंपनी मालकांने त्यांना पगार दिला नव्हता. हा रखडलेला पगार मिळावा आणि कंपनी मालकाला धडा शिकवावा यासाठी त्यांनी हा बनाव रचल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.
पुन्हा एकदा तरुणींकडे विचारणा होणार
या तरुणींनी दिलेल्या तक्रारीचा आम्ही गांभीर्याने तपास केला. मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही. आम्ही या तरुणीने आज पुन्हा पोलीस ठाण्यात बोलून चौकशी करणार आहोत. त्यातून काय निष्पन्न होते का ते तपासले जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd