वसई: दोन मोटर सायकलींची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. वसई पूर्वीच्या सुरक्षा स्मार्ट सिटी येथे शनिवारी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या राजावली परिसरात सुरक्षा स्मार्ट सिटी आहे. वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ९ च्या सुमारास भरधाव वेगात असलेली एक्टिवा गाडी तसेच एक दुचाकी समोर समोर धडकली. त्यामध्ये गाडीवर बसलेले तीन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.रस्ता निमुळता असल्याने वाहनांना अंदाज न आल्याने दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली आणि हा अपघात घडला. सध्या मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.