लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : नालासोपारा स्थानकात तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली आहे. विजयकुमार पंडित असे तिकीट निरीक्षकाचे नाव असून या मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
Noida officials ignore elderly man, get stand-up punishment from CEO Watch Viral video
कर्मचाऱ्यांनी केली ही चूक, अधिकाऱ्याने सर्वांना दिली ‘उभे राहण्याची शिक्षा, नक्की घडलं तरी काय? Viral Video पाहून आठवतील शाळेचे दिवस
Neelkamal Boat Accident, Maritime Board Officials ,
‘मेरिटाईमच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी’
pune worker gas tank nozzle hit on eye
सीएनजी पंपावर गॅसचे ‘नोझल’ उडाल्याने कामगाराचा डोळा निकामी, धनकवडीतील घटना; पंप मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा
Pankaj Bhoyar Minister , Wardha District Co-operative Sector , Wardha, Co-operative Sector Pankaj Bhoyar,
वर्धा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर ताबा मिळविण्याचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे लक्ष्य

गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास विजयकुमार पंडित नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकीट तपासणीचे काम करीत होते. याच दरम्यान पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल मध्ये एक प्रवासी द्वितीय श्रेणीचे तिकीट घेऊन प्रथम श्रेणीच्या डब्ब्यातून प्रवास करताना आढळून आला.

आणखी वाचा-वसई विरार महापालिकेची समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम १३ हजार नागरिकांचा सहभाग, ५१ टन कचरा संकलित

त्या प्रवाशाला तिकीट अडविल्या नंतर त्याला ३४५ रुपये इतका दंड ठोठावला होता. त्याच्याकडे फक्त २१० रुपये असल्याचा दावा प्रवाशाने केला होता. त्यामुळे त्याला १५० रुपये इतका दंड आकारला होता. मात्र दंडाची पावती फाडल्यानंतर त्यांच्या बाचाबाची होऊन प्रवाशाने मागून हॉकीस्टिकने तिकीट निरीक्षकाला मारहाण केली. यात एक प्रहार त्यांच्या कानाजवळ झाल्याने पंडित हे जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ओले. तर मारहाणीनंतर हल्लेखोर प्रवासी फरार झाला आहे.

याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या प्रवाशाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.

Story img Loader