लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: रविवारी वसई विरार महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा रंगली होती. स्त्री भ्रूण हत्या टाळा, हरित वसईचा संदेश घेत १४ हजाराहून अधिक स्पर्धकांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. या मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन याने २ तास २१ मिनिटे ४८ सेकंदात ४२ किमीची धाव पूर्ण करीत विजेतेपद पटकावले.  तर २१ किमीच्या अर्ध मॅरेथॉन महिला गटात प्राजक्ता गोडबोले व पुरुष गटात एम डी नूरहसन यांनी बाजी मारली आहे.

Ranji Trophy 2024 Drying Pitch By Burning Cow Dung Cakes Desi Jugaad In Match Bihar vs Karnataka
Ranji Trophy : बिहार-कर्नाटक सामन्याची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क ‘देसी जुगाड’, शेणाच्या गवऱ्या जाळतानाचा फोटो व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
BJP MLA preparing for rebellion Supporters are invited to fill the application form Wardha
भाजप आमदार बंडखोरीच्या तयारीत? अर्ज भरण्यास दिले समर्थकांना निमंत्रण
ticket inspector caught ticketless passengers, ticketless passengers,
महिला तिकीट तपासनीसाने एकाच दिवसात पकडले १०३ विनातिकीट प्रवासी, वाचा कसे आणि किती दंड वसूल केला
india strong reaction against 9 sports dropped from commonwealth games 2026
अन्वयार्थ : राष्ट्रकुल स्पर्धेचा वाद… अकारण नि अवाजवी!
anna bansode
पिंपरी विधानसभा: अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध; १८ माजी नगरसेवकांचा ठराव
Embarrassment for BJP from Sakoli and Tumsar constituencies in Bhandara district Print politics news
भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांवरून भाजपसमोर पेच; युती धर्म पाळून हक्काच्या जागा सोडणार?

वसई विरार महापालिकेची ११ वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी साडे पाच वाजता या स्पर्धेला सुरवात झाली होती. या स्पर्धेत  देशभरातील विविध ठिकाणचे हजारो धावपटू यात सहभागी होत ५ किमी, ११ किमी, २१ किमी, ४२ किमी अंतर पूर्ण केले. मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी विविध ठिकाणच्या मार्गावर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहचला होता यामध्ये लहान मुले, महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत उपस्थितांना  विविध सामाजिक संदेश दिले.

आणखी वाचा-‘नोकरी घालवून रस्त्यावर आणू…’, वसईतील अनेक पोलीस अधिकार्‍यांना कर्ज वसुली एजंटच्या धमक्या

या स्पर्धेत २१ किमी अर्ध मॅरेथॉन महिला गटात प्राजक्ता गोडबोले हिने प्रथम क्रमांक पटकावला तर तामसी सिंग हिने द्वितीय व फुलन पाल हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर २१ किमी पुरुष गटात एम डी नूरहसन याने प्रथम क्रमांक व पुनीत यादव  द्वितीय व अरुण राठोड याने तृतीय क्रमांक मिळविला. ४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन याने प्रथम क्रमांक पटकावत विजेता ठरला तर मोहित राठोड द्वितीय व तडाखे चिंधू  तृतीय क्रमांक पटकाविला

या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पारुळ चौधरी इव्हेंट अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित होती.तर सिनेकलाकार महेश मांजरेकर,दत्तू मोरे, समीर चौगुले, अरुण कदम, ओमकार राऊत यांनी हजेरी लावली होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, खासदार राजेंद्र गावित, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर राजीव पाटील, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-लोकसत्ता ‘ इम्पॅक्ट ‘ : वसई विरार पालिका क्षेत्रात अखेर रस्त्यांच्या यांत्रिक सफाईला सुरुवात…

शासकीय व पोलीस अधिकारी धावले

वसई विरार महापालिकेच्या ११राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत  शासकीय अधिकारी व पोलीस दलाचे अधिकारी यांनीही सहभाग नोंदवला होता. यामध्ये आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी ४२ किमीचे अंतर पूर्ण केले.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील, पालघर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी २१ किलोमीटरची धाव पूर्ण केली यासह पोलीस दलातील, विविध शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. ४२ किमीचे धाव घेत असताना एक चांगला अनुभव या शहरात आला असल्याची प्रतिक्रिया आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी दिली.

मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल

४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा

तीर्था पुन – २ तास २१ मिनिटे ४८ सेकंद
मोहित राठोड- २ तास २६ मिनिटे ४३ सेकंद 
तडाखे चिंधू – २ तास २८ मिनिटे ३६ सेकंद

अर्ध मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष )

एम डी नूरहसन – १ तास ४ मिनिटे ४५सेकंद
पुनीत यादव –  १ तास ४ मिनिटे ४९ सेकंद
अरुण राठोड – १ तास ४ मिनिटे ५३ सेकंद

अर्ध मॅरेथॉन महिला 

प्राजक्ता गोडबोले – १ तास १८ मिनिटे १२ सेकंद 
तामसी सिंग – १ तास २० मिनिटे ०९ सेकंद 
फुलन पाल-  १ तास २० मिनिटे २८ सेकंद