सुहास बिर्‍हाडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई : वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात १२ उड्डाणपूल आणि ७ रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामांचा प्रस्ताव नव्याने एमएमआरडीएकडे पाठवला आहे. एमएमआरडीएने या कामांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पुलांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर एवढे आहे. वसई विरार शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. नवनवीन वसाहती विकसित होत आहेत. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी मेसर्स टंडन ॲण्ड कंपनीला सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांनी शहराचे रस्ते, वाढती लोकसंख्या, वाहने यांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला होता. शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रमुख नाके आणि रस्त्यांवर १२ उड्डाणपूल बांधण्याचा गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने १२ उड्डाणपूलांचा पहिला प्रस्ताव २०१४-१५ मध्ये सादर केला होता. त्याचा अपेक्षित खर्च २३९ कोटी ९३ लाख रुपये एवढा होता. मात्र निधी अभावी हे काम रखडले होते.

आणखी वाचा-राज्यातील बेकायदेशीर वाहन घोटाळा प्रकरण, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वसईत ४ वाहने जप्त

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत महापालिका क्षेत्रातील विकास कामांना विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्ग येणारी कामे बाह्य रस्ते विकास योजनेचे मंजूर धोरणानुसार हाती घेण्याची प्रचलित पध्दत आहे. या योजनेमध्ये मुंबई महागनर स्थानिक स्वराज्य संस्थाना नवीन रस्ते बांधणे, जुन्या रस्त्याचे धोरण मजबुतीकरण, नूतनीकरण व रुंदीकरण करणे इत्यादींसाथी अर्थसहाय्य करण्यात येते. त्यामुळे या धोरणानुसार ही कामे करून घेण्यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शहरात १२ उड्डाणपूल तसेच ७ रस्त्यांच्या कामांचे कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला एमएमआरडीए मार्फत मंजुरी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार पालिकेने प्रस्ताव तयार केला होता. नोव्हेंबर महिन्यात पालिकेने नव्याने एमएमआरडीएला १२ उड्डाणपूल तसेच रस्त्यांच्या कामांचे अंदाजपत्रके, आराखडे, हमीपत्र तसेच इतर कागदपत्रे सादर केली होती. त्या प्रस्तावाला एमएमआरडीएने मंजुरी देण्याची प्रक्रिया सुर केली आहे. या रस्ते आणि उड्डाणपूलांच्या कामांचे अंदाजपत्रक व आराखडा करण्याचे काम खासगी सल्लागार कंपनीला दिले आहे. त्यामुळे शहरात १२ उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी वाचा-वाहनांचे क्रमांक अचूक टिपणार्‍या कॅमेर्‍याचा फायदा; एका वर्षात वसई, ठाणे, मुंबईतील ९० गुन्हे उघडकीस

७ प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण होणार

याशिवाय विरार फाटा ते अर्नाळा (१८ किलोमीट), नालासोपारा फाटा ते नालासोपारा पश्चिम( ११ किमी), वसई फाटा ते वसई गाव (११ किमी), टिवरी फाटा ते भोयदापाडा (५ किमी), सातिवली फाटा ते रेंज ऑफिस (४ किमी) वर्धमान इंडस्ट्रियल,वालीव ते गावराईपाडा नाका (३ किमी), बाफाणे फाटा ते उमेळा फाटा( १० किमी) या रस्त्यांच्या कामांचे कॉंक्रीटीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यावेमुळे रस्ते रुंद होऊन वाहतूकीचा वेग वाढणार आहे.

वसई विरार शहरातील प्रस्तावित १२ उड्डाणपूल

माणिकपूर नाका, वसई (पश्चिम)- ३७.६१ कोटी

रेंज ऑफिस, गोखिवरे, वसई (पू)- २५.७३ कोटी

श्रीपस्थ पाटणकर पार्क जंक्शन, नालासोपारा (प)- २०.२१ कोटी

चंदन नाका जंक्शन, नालासोपारा (पू)- २४.८२ कोटी

लक्ष्मी शॉपिंग सेंटर जंक्शन, नालासोपारा- ६५.२३ कोटी

बोळींज खारोडी नाका, विरार (प)- २१.९३ कोटी

सायन्स गार्डन, विरार (प)- २१.९३ कोटी

मनवेलपाडा विरार (पू)- २३.६६ कोटी

फुलपाडा जंक्शन, विरार (पू)- २४.३५ कोटी

बाभोळा नाका, वसई (प)- ४१.३१ कोटी

वसंत नगरी, नवघर, वसई (पू)- ६६.८० कोटी

नारिंगी, साईनाथ नगर, विरार (पू)- २१.९३ कोटी