भाईंदर : मिरा रोड व भाईंदर शहरात सध्या सिमेंट रस्ते उभारणी व इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. तर यांचा गंभीर फटका आता बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांना सहन करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील तीन वर्षांपासून मिरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर मेट्रो मार्गीका उभारण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून अनेक वाहनचालक हे प्रवासासाठी अंतर्गत रस्त्याचा वापर करू लागले आहेत. याने काहीश्या अंशी वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे. परंतु आता पुन्हा शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यावर सिमेंट रस्त्याची उभारणी, महानगर गॅस वाहनी आणि विद्युत वाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. परिणामी या रस्त्यांवर देखील खोदकाम केले जात असून वाहतुकीसाठी केवळ अरुंद रस्ता शिल्लक राहिला आहे. याचा मोठा परिणाम हा शहराच्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.

हेही वाचा – वसई : मत्स्य दुष्काळामुळे बोटी बंद ठेवण्याची वेळ, बंदीनंतर काही बोटी रवाना

हेही वाचा – मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ९४५ नवीन पोलीस रूजू

यात दुपारी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत वाहनांना मार्ग काढने कठीण होत आहे. त्यामुळे कित्येकदा लहानसे अंतर गाठण्यासाठी शालेय बस गाड्यांचा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाया जात आहे. अशा परिस्थितीत उद्यापासून सुरु होणाऱ्या बारावी बोर्डाच्या विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या प्रवाशाचे नियोजन करणे कठीण होणार आहे. त्यात एखादा विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकून परीक्षेला उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने तसेच वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शिवसेना १४६ विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर यांनी केली आहे. तर याबाबत नुकतेच पालिका आयुक्त संजय काटकर यांनी निर्देश दिले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion problem ahead of board exams in bhayander ssb