लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामण नायगाव उड्डाणपुलाखाली मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ट्रक बंद पडला होता. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटर लांब इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई व अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Dispute over setting up kite stall two former BJP corporators clashed
पतंगाचा स्टॉल लावण्यावरून वाद, भाजपच्या दोन माजी नगरसेविका आपसात भिडल्या
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
Vasai Nalasopara Constituency, Vasai Nalasopara latest news, Vasai Nalasopara Constituency candidates,
वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
BJP MLA Parag Shah is Maharashtra's Wealthiest Candidate from Ghatkopar East Constituency
‘५०० कोटींवरून पाच वर्षात थेट ३३०० कोटी’, सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीचा तपशील वाचून डोळे गरगरतील
youth drowned
वसई: अर्नाळा येथील विसावा रिसॉर्टमध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास कामण नायगाव या दरम्यान कंटेनरची ट्रकला धडक लागली. या धडकेत दुभाजक कोसळला व ट्रक ही बंद पडला त्यामुळे अहमदाबाद वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली होती.

आणखी वाचा-भाईंदर : अल्पवयीन मुलीची रिक्षाचालकाने काढली छेड, नागरिकांनी चोप देत काढली धिंड

त्यामुळे काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढली होती. त्याचा परिणाम वसई ते ठाणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर झाला आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली होती. दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. मुंबई वाहिनीवर दहा ते बारा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. दोन ते तीन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

ट्रक अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही मार्गावर ये जा करण्यासाठी केवळ एक एक वाहिनी होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना अडचणी आल्या होत्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले आहे.

Story img Loader