वसई – वसई- भरधाव वेगाने जाणार्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात वाहनामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातिवली पूलावर बुधवारी सकाळी ६ वाजता हा अपघात घडला. या अपघातामधील सर्व मयत आणि जखमी राजस्थान मधील रहिवाशी होते. याप्रकरणी वाहनचालकावर वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून बुधवारी एक गाडी (एचआर २० ए जी ०२२६) गुजराथच्या दिशेने जात होती. या गाडीत ५ जण प्रवास करत होते. सकाळी ६ च्या सुमारास गाडी महामार्गावरील सातिवली उड्डाणपूलावरून जात असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. वाहन दुभाजकाला धडक देत मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गिकेवर गेले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला या वाहनाने धडक दिली. या अपघातात अशोककुमार पप्पूराम, किशन बडगुजर आणि बनवारीलाल बाबुलाल देढिया यांचा मृत्यू झाला. तर चालक गोर्धन शर्मा आणि सुभाष वाल्मिकी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी आणि मयत हे राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील सिंघानिया गावात राहणारे होते. त्याचे वय २५ ते ४९ दरम्या आहेत. जखमींवर वसईच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – मित्राने कर्जाचे हप्ते न फेडल्याने व्यापार्याने केली आत्महत्या; भाईंदर मधील घटना
हेही वाचा – जूचंद्र येथील रांगोळीकार संजय पाटीलने स्पेनमध्ये साकारली रांगोळी
याप्रकऱणी आम्ही वाहनचालक गोर्धन शर्मा याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामधील सर्व मयत आणि जखमी हे राजस्थान मधील रहिवाशी होेते. त्यांचे नातेवाईक आल्यानंतर इतर माहिती स्पष्ट होईल, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी सांगितले.