विरारमधून एका नायजेरियनसह दोघांना अटक

विरार: मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने विरारमध्ये कारवाई करत ५० लाखांचे अमली पदार्थ जप्त करत एका नायजेरियन नागरिकासह दोन भारतीयांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५० लाखांच्या किमतीचे एमडी ड्रग्सच्या २००० कॅप्सूल जप्त केल्या आहेत.

मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने टाळेबंदीत अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या तोलींवर कारवाईचा बडगा उभारला होता. त्या नुसार पोलिसांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. त्यानुसार त्यांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने विरारमध्ये एक नायजेरियन नागरिक काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात एमडी ड्रग्सचा व्यापार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत विरार हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४२० ग्राम एमडी ड्रग्स वजनाचे २००० कॅप्सूल पोलिसांनी जप्त केल्या. हे ड्रग्स त्यांनी चारचाकी वाहनाच्या गेअर पुली प्लेटमध्ये लपवून ठेवले होते. याची किंमत ५० लाखांच्या जवळपास आहे. यात पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकासह २ कुरिअरचे काम करणाऱ्या इसमांना अटक केली आहे. हे कुरिअरच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत माल पोहोचवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

५० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ आरोपींनी चारचाकी वाहनाच्या गेअर पुली प्लेटमध्ये लपवून ठेवले होते.

Story img Loader