वसई – खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे ही दुर्घटना घडली. आणखी ३ मुले बुडाल्याची शक्यता असून अग्निशमन दलामार्फत त्यांचा शोध सुरू आहे.

वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे असलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाले होते. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी माती काढण्यात आल्याने हा खड्डा तयार झाला होता. शनिवारी दुपारी परिसरातील काही मुले या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र त्यातील काही मुले बुडाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. स्थानिकांनी अमित शर्मा (११) आणि अभिषेक शर्मा (१३) या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. आणखी ३ मुले बुडाली असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली. वसई विरार अग्निशमन दलामार्फत अन्य मुलांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – वसई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेची पाहणी, बचाव कार्य पुन्हा सुरू

हेही वाचा – शहरबात : एवढा माज येतो कुठून…?

आम्ही घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वी दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. स्थानिकांनी आणखी ३ मुले बुडाल्याची शक्यता वर्तवली असल्याने शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली. कदाचित अन्य मुले पळून गेली असण्याचीही शक्यता आहे.

Story img Loader