लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: वसई दिवा मार्गावर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रात्री उशिरापर्यंत हे डबे बाजूला करण्याचे काम सुरू होते.

शुक्रवार संध्याकाळी दिवा वसई मार्गावरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. माल डब्बे रूळ बदलून दुसऱ्या रुळावर जात होता तेव्हा हा घटना घडली. ही मालगाडी रिकामी होती त्यात असणाऱ्या लोको पायलट व गार्ड यांना कोणतीही हानी झालेली नाही आहे. यामुळे ५ आणि ६ क्रमांकाच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परंतु मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू असल्याने रेल्वेने सांगितले.

आणखी वाचा-नालासोपार्‍यात महिलेची गळा चिरून हत्या

या अपघातामुळे दिवा वसई मार्गाची वाहतूक कामण मार्गाने वळविण्यात आली आहे. अपघातग्रस्त मालगाडीचे डबे रुळावरून हटविण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader