सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, ६ दिवसांची पोलीस कोठडी

वसई: १२ वी पास असलेला तोतया डॉक्टर सुनील वाडकर याच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा येथील बेकायदा असलेल्या नोबेल रुग्णालयात वाडकर हा करोना रुग्णांवर उपचार करत होता. त्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. केवळ १२ वी पास असलेला सुनील वाडकर हा ठकसेन वसई-विरार शहरात १४ वर्षांपासून डॉक्टर बनून वैद्यकीय व्यवसाय करत होता. विरार येथे त्याने ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ नावाचे दोन अनधिकृत रुग्णालय सुरू केले होते. याप्रकरणी तो तुळींज पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. तपासामध्ये त्याने कोविड रुग्णांवर उपचार केल्याचे आढळले. यापैकी दोन रुग्णांचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वाडकर याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली, अशी माहिती या प्रकरणाचे तपास करणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. म्हात्रे यांनी दिली.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्या सकाळी १० वाजेपर्यंत…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
Image of a well
पत्नीशी वाद झाला म्हणून तरुणाने दुचाकीसह मारली विहिरीत उडी, वाचवायला गेलेल्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू
Police Sub Inspector dies in accident while returning home from duty pune news
पिंपरी : बंदोबस्तावरून घरी जाताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

तुळींज पोलिसांनी शोधले पुरावे..

१४ डिसेंबरला सुनील वाडकरला विरारच्या हायवे या अनधिकृत रुग्णालयातून पहिल्यांदा गुन्हे शाखेने अटक करून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. पोलिसांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने वाडकरच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयातील सर्व दस्तावेज, रजिस्टर, संगणक, सीसीटीव्ही चित्रण गायब केले होते.   मात्र तुळींज पोलिसांनी नोबेल रुग्णालयातून दडवलेली एक फाइल शोधून काढली आणि त्यात शंभर रुग्णांवर वाडकरने उपचार केल्याची माहिती मिळाली. वाडकर हा १२ वी उत्तीर्ण होता. त्याच्या नोबेल या अनधिकृत रुग्णालयाला कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी नव्हती,  अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. वाडकरच्या पत्नीने नोबेलमधील पुरावेदेखील नष्ट केले होते पण त्यांच्याकडून नजरचुकीने एक फाइल गायब करायची राहिली आणि ती पोलिसांना सापडली. 

Story img Loader