सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, ६ दिवसांची पोलीस कोठडी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई: १२ वी पास असलेला तोतया डॉक्टर सुनील वाडकर याच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा येथील बेकायदा असलेल्या नोबेल रुग्णालयात वाडकर हा करोना रुग्णांवर उपचार करत होता. त्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. केवळ १२ वी पास असलेला सुनील वाडकर हा ठकसेन वसई-विरार शहरात १४ वर्षांपासून डॉक्टर बनून वैद्यकीय व्यवसाय करत होता. विरार येथे त्याने ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ नावाचे दोन अनधिकृत रुग्णालय सुरू केले होते. याप्रकरणी तो तुळींज पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. तपासामध्ये त्याने कोविड रुग्णांवर उपचार केल्याचे आढळले. यापैकी दोन रुग्णांचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वाडकर याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली, अशी माहिती या प्रकरणाचे तपास करणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. म्हात्रे यांनी दिली.
तुळींज पोलिसांनी शोधले पुरावे..
१४ डिसेंबरला सुनील वाडकरला विरारच्या हायवे या अनधिकृत रुग्णालयातून पहिल्यांदा गुन्हे शाखेने अटक करून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. पोलिसांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने वाडकरच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयातील सर्व दस्तावेज, रजिस्टर, संगणक, सीसीटीव्ही चित्रण गायब केले होते. मात्र तुळींज पोलिसांनी नोबेल रुग्णालयातून दडवलेली एक फाइल शोधून काढली आणि त्यात शंभर रुग्णांवर वाडकरने उपचार केल्याची माहिती मिळाली. वाडकर हा १२ वी उत्तीर्ण होता. त्याच्या नोबेल या अनधिकृत रुग्णालयाला कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी नव्हती, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. वाडकरच्या पत्नीने नोबेलमधील पुरावेदेखील नष्ट केले होते पण त्यांच्याकडून नजरचुकीने एक फाइल गायब करायची राहिली आणि ती पोलिसांना सापडली.