पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. हा पोलीस वसई विरार मध्ये पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवत होता. दोन पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून या पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नालासोपारामधील जोगेंद्र राणा चकमक प्रकरण, दोन पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल

Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Baba Siddique murder case, Accused arrested from Ludhiana, Baba Siddique latest news, Baba Siddique marathi news,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक
Gang rape of a minor girl vasai crime news
वसई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
sexual harassment
पुणे: शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

२८ वर्षीय आरोपी आणि त्याची २५ वर्षीय मैत्रीण हे वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आरोपी हा वसई विरार शहरात पोलीस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेला येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आरोपी क्लासला येणार्‍या मुलींना अश्लील मेसेजेस पाठवता होता तसेच व्हिडियो कॉल करून अश्लील कृत्य करत होता. शिकविण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरिराला हेतुपूरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता. अनेकदा मुलींना पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा तसेच त्यांना फिरायला बोलवत होता. त्याची मैत्रीण असलेल्या आरोपी महिला पोलिसांनी याने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे.तिने एका पीडित मुलीचे व्हॉटसप स्कॅन करून आरोपी गावडे बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. हा प्रकार असह्य झाल्याने या मुलींनी क्लास मध्ये जाणे बंद केेले.

हेही वाचा >>> ‘ईडी’चे समन्स येताच बदली; ‘यूएलसी’ घोटाळय़ाप्रकरणी दिलीप ढोले अडचणीत; मीरा-भाईंदर पालिकेच्या आयुक्तपदी काटकर

या प्रकाराचा मानसिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला आणि बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपी पोलीस आणि त्याची मैत्रीण असलेल्या महिला पोलिसाविरोधात  दोघांविरोधात विनयभंगाचे कलम ३४५, ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) कलम ८, १२, १७ तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियमाच्या कल् ६६ सी आणि ६७ ए अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. आम्ही पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. या प्रकरणात आणखी मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.