वसई : विरार पूर्वेच्या शिरसाड- वज्रेश्वरी महामार्गावरील पारोळ फाटा येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
विरार पूर्वेच्या भागातून शिरसाड-वज्रेश्वरी महामार्ग गेला आहे. दररोज या रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. रविवारी दुपारी या मार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकीचा अपघात घडला. ट्रकचे चाक दुचाकी चालकाच्या अंगावरून गेल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा – भाईंदर : दुकानावरील इंग्रजी पाट्यांवर मनसे फासले काळे
मारुती तुकाराम गवा (२५) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव असून ते विरार पूर्वेच्या बरफपाडा येथे राहणारे आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.