विरार : विरार जवळील वैतरणा जेट्टीवर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच घरातील चार महिला ग्रुप सेल्फी काढत असताना त्यांचा तोल जाऊन चार महिला या चारही महिला पाण्यात पडल्या. यातील दोन मिहिलांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर दोन महिला बुडून मरण पावल्या. या सर्व महिला फणसपाडा या गावातील रहिवाशी असुन दासाना कुटुंबातील आहेत. या चार महिलांत ३ बहिनी आणि एक भावजय असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. लीला धमसिंह दासना (२४), सत्तू घासी दासना (१४) या दोन बहीनींचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर बसंती दासना आणि तीची भावजय बचावली आहे. हे कुटुंब मुळचे मारवाड मधील असून काही वर्षापुर्वी वैतरणा या ठिकाणी राहण्यासाठी आले होते.
विरार जवळील भागात वैतरणा परिसर आहे. या भागात नुकताच नवीन जेट्टी तयार करण्यात आली आहे. या जेट्टीवर या महिला रोज फेरफटका मारण्यासाठी येत होत्या. पण शनिवारी सायंकाळी सेल्फी टिपण्याच्या नादात ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरीक, मांडवी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी दिली आहे.