वसई : नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देविदास विनायक जाधव (३५) असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास जाधव याला १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी व इमारतीमधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे. देविदास हा नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील ‘द फिटनेस कार्डेस’ या व्यायाम शाळेत तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. व्यायाम प्रशिक्षकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

do you have sinus and breathing problems
Video : तुम्हाला सायनस किंवा श्वसनाशी संबंधित त्रास होतो? भस्त्रिका प्राणायाम करा, जाणून घ्या कसे करावे?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
Vidyut Jammwal
Vidyut Jammwal : “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे हे १० किलोमीटर धावण्याइतके फायदेशीर” अभिनेता विद्युत जामवालचा दावा; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
College students die in ordnance factory explosion in bhandara
आयुध निर्माणीतील स्फोटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, प्रशिक्षणार्थी कामगार..
Patients suffer due to lack of facilities at Shatabdi Hospital in Govandi Mumbai print news
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा उपोषणाचा इशारा
Heart disease risk , non vegetarian , health care,
हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…
Story img Loader