वसई: वसई विरार शहरात पुन्हा एकदा मोटारसायकली जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रविवारी पहाटे विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे अज्ञात इसमाने तीन मोटरसायकली जाळून टाकल्या. यामुळे परिसरात एकच घाबराट पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत राहणारे काही तरुण विरार पूर्वेच्या मनवल पाडा येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कमला नगर चाळ येथे रात्री दोन पर्यंत हे तरुण जागे होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास अचानक स्फोटाचा आवाज आला त्यावेळी त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता तीन मोटरसायकली जळत असल्याचे दिसून आले. ताबडतोब अग्निशमन दलाला तसेच विरार पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. अज्ञात व्यक्तीने या मोटरसायकली जाळल्या होत्या. त्यामध्ये दोन या बाईक तसेच एका स्कुटीचा समावेश आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीची गॅलरी कोसळली, इमारतीमधील ३० कुटुंबे सुरक्षित, जिवितहानी नाही

बाईक नेमक्या कशामुळे जाळल्या ते अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे विरार पोलिसांनी सांगितले. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्याचाच फायदा या व्यक्तीने घेतला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.