वसई : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ३४७ नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

वसई विरारच्या भागात मागील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले व कापणीसाठी तयार झालेल्या भात पिकांचे नुकसान झाले होते तर भाजीपाला, फळबागा यांनाही पावसाचा फटका बसला होता. तर दुसरीकडे किनारपट्टीच्या अर्नाळा, किल्लाबंदर, पाचूबंदर या भागात सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेल्याने मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले होते. अवकाळीने नुकसान झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम वसईच्या तहसील विभागाने सुरू केले आहे.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

हेही वाचा – वसई : इन्स्टाग्रामवर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची फसवणूक, ५ दिवसांत महिलेने गमावले चक्क १६ लाख रुपये

हेही वाचा – वसई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील छायाचित्रे वायरल, फरार आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक

तलाठी, मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचारी जागेवर जाऊन पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ३४७ नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर ४५० इतक्या मच्छिमार यांच्या मासळीचे नुकसान झाले आहे त्यांची माहिती घेतली आहे असे वसईचे तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी यांनी सांगितले.