वसईच्या वसंत नगरी परिसरात एका २० वर्षीय तरूणाने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आंनद के प्रसाद असे नाव असून बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. माणिकपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचा कारण तपासत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई पुर्वेच्या वसंत नगरी सेक्टर २ मध्ये सोमवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीत राहणारा आंनद के प्रसाद (२०) हा सकाळी ७ वाजता घरातून खासगी शिकवणीला जाण्यासाठी घराबाहेर पडला. पण तो शिकवणीला न जाता, इमारतीच्या गच्चीवर गेला. सकाळी १० वाजताच्या सुमारास काहीतरी पडल्याचा मोठ्याने आवाज झाला. यामुळे इमारतीचा सुरक्षा रक्षक धावत आवाजाच्या दिशेने गेला असता. त्याला आनंद जमिनीवर पडल्याचा आढळून आला. सुरक्षा रक्षकाने इमारतीतील इतरांना तत्काळ याबाबत सांगितले. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगीतले की, सदर घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांशी आणि महाविद्यालयात चौकशी केली. पण आत्महत्या करण्याचे कारण मिळेल अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. सर्वांशीच त्याचे चांगले संबध होते. यामुळे आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai a 12th student committed suicide by jumping from the roof of a building msr