वसई- फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडे असलेल्या बेडीच्या चावीने नकली पोलिसाचे बिंग फुटले. आरोपी नकली पोलीस बनून वावरत होता. त्याच्याकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि इतर वस्तू आढळून आल्या.

वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून काही दिवसांपूर्वी एका ठकसेनाने १ लाख ६० हजारांचा मोबाईल फोन विकत घेतला होता. या ठकसेनाने दुकानदाराची फसवणूक करण्यासाठी १ लाख १० हजाराांची रक्कम बॅंकेत एनईफटीद्वारे ट्रान्सफर केल्याचे भासवले आणि तसा एडीट केलेला खोटा मेसेज दाखवला. तसेच ५० हजारांचा बनवाट धनादेश दिला होता. दुकानदाराच्या नंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”

हेही वाचा – वसई : अवघ्या २० रुपयांच्या वादात पोलिसाने फोडले नाक, मारहाण करणार्‍या पोलिसावर अखेर गुन्हा दाखल

..आरोपीच्या हातातील की चेनमुळे फुटले बिंग

वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपी फैजुल अबू हसन शेख (२८) याला अटक केली. त्याची चौकशी सुरू असताना त्याच्या हातात असलेल्या चावीला बेडी असलेली की चेन दिसली. त्यामुळे पोलिसांनी कुतूहलापोटी बेडी असलेल्या कि-चेनचा तपास केला असता धक्कादायक माहिती मिळाली. आरोपीकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र, नियुक्ती पत्रे, पोलीस वापरतात तशा एकूण ३० वस्तू आढळून आल्या. त्यामुळे तो नकली पोलीस बनून वावरत असल्याचे निष्पन्न झाले. मला पूर्वी पोलीस बनवायचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने तो पोलीस बनून वावरत असल्याचा दावा आरोपीने केला आहे. मात्र त्याने पोलीस बनून फसनवणुकीचे गुन्हे केले असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

हेही वाचा – ध्रुव राठीची चित्रफीत प्रसारित केल्याने वकिलाविरोधात गुन्हा ; वसईतील घटना

आरोपीने यापूर्वी देखील अशाच पद्धतीने बनावट धनादेश देऊन एक दुचाकी घेतली होती. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानर, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे आदींच्या पथकाने या नकली पोलिसाला अटक केली.

Story img Loader