वसई- विरारच्या मनवेल पाडा तलावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास महापालिका चालढकल करत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी नाक्यावरच अर्धाकृती पुतळा उभारला आहे. जोपर्यंत तलावात पूर्णाकृती पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत हा अर्धकृती पुतळा हटविणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यामुळे पालिका आणि पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

वसई विरार महापालिका शहरातील तलाव आणि उद्यानांचे सुशोभीकरण करत आहे. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे पालिकेचा तलाव आहे. या तलावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच लगतच्या उद्यानात अभ्यासिका आणि वाचनालय उभारावे अशी मागणी २०१८ पासून आंबेडकरी कार्यकर्ते करत होते. पालिकेने पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाचे नियम दाखवून पुतळा उभारता येणार नाही असे सांगितले गेले. परंतु अनेक ठिकाणी २०१२ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. मिरा भाईंदर महापालिकेतही डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हे पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही पालिका पुतळा उभारण्यास चालढकल करत होती.

Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Kalyan-Dombivli Municipal corporation,
महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Flamingos and Other Migratory Birds Flock to Ujani Dam
भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग

हेही वाचा – नालासोपाऱ्यात दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त; नायजेरियन महिलेला अटक

अखेर कार्यकर्त्यांनी अनोखी शक्कल लढवली. मनवेल पाडा तलावासमोरील नाक्यावरच डॉ. आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा रातोरात उभारण्यात आला. सकाळी ही बाब समजताच पोलीस आणि पालिकेची धावपळ उडाली. हा पुतळा बेकायदेशीररित्या उभारण्यात आला असून तो काढण्यासाठी पालिका आणि पोलीस घटनास्थळी आले. मात्र आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पुतळा हटिवण्यास विरोध केला. जोपर्यंत मनवेलपाडा तलावात पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत येथील पुतळा हटवणार नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. आम्ही २४ तास आळीपाळीने या पुतळ्याचे रक्षण करणार आहोत. आता जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही, असे ॲड. गिरीश दिवाणजी यांनी सांगितले.

हेही वाचा – वसई : विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर संतप्त पालकांचा शाळेवर मोर्चा, अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

पालकमंत्री १६ ऑगस्टला बैठक घेणार

वाद वाढल्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्ती केली. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मनवेल पाडा तलावात पुतळा उभारण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत नाक्यावरील डॉ. आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा हटवू नये असे निर्देश त्यांनी पालिकेला दिले आहेत. या आंदोलनात सर्वपक्षातील आंबेडकरी कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यात मनोज खाडे, सूचित गायकवाड, संजय गायकवाड, सुविध पवार, समीर मोहिते, ॲड. गिरीश दिवाणजी, ॲड. कीर्तीराज लोखंडे, दिलीप गायकवाड, सारिका सकपाळ, गीता जाधव, मनोज जाधव, एकनाथ निकम, नितीन उबाळे, सुशांत पवार आदींचा समावेश होता.

Story img Loader