वसई : नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यात चोरट्यांनी ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास केली आहे.

हेही वाचा – माजी नगरसेविकांचे वायरल चित्रफित प्रकरण; आमदार गीता जैन समर्थकांविरोधात गुन्हा दाखल

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा – विरारच्या चिखलडोंगरी गावात पुन्हा जात पंचायतीची दहशत, महिलेला जमावाची मारहाण, पोलीस बघ्याच्या भूमिकेत

नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत नवकार फेज थ्री इमारत आहे. या इमारतीत ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले. यातील चार लाख २९ हजार ७०० इतकी रोकड लंपास केली आहे.
नायगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एटीएम फोडताना त्या ठिकाणी दोन व्यक्ती असल्याचे समजले आहे, मात्र आणखी त्याचे साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे. त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली. यापूर्वीसुद्धा वसई विरारमध्ये एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.