वसई- कौटुंबिक कलह, वाद असणार्‍या जोडप्यांमध्ये समेट घडवून त्यांच्या विस्कटलेल्या संसाराना जोडण्याचे काम करण्यात पोलिसांच्या भरोसा कक्षाला यश येत आहे. कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचारातून सुटका करून त्यांना न्याय देण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वसई आणि भाईंदर येथील भरोसा कक्षाने २०२४ या वर्षात सामोपचाराने तोडगा काढून सुमारे १ हजार संसार सावरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणे वाढत आहेत. पती पत्नीच्या एकमेकांविरोधात तक्रारी असतात. महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी बडत असतात. वाद आणि भांडणे वाढतात परिणामी पती विरोधात पोलिसात तक्रारी देण्यात येतात. यामुळे कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल होतो. मूळ प्रश्न सुटत नाही पण संसार विस्कटतो. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून भरोसा कक्ष स्थापन करण्यात आला होता. पोलीस आयुक्लायात भाईंदर आणि वसईत प्रत्येकी दोन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. आलेल्या अर्जावर दोन्ही पक्षामध्ये चर्चा घडवून समेट घडविण्याचे काम कक्षातील महिला अधिकारी करत असतात. गुन्हा दाखल होऊन संसार तुटण्याऐवजी समुपदेशन करून संसार टिकविण्यावर त्यांचा भर असतो. दोन्ही कक्षांनी मिळून २०२४ या वर्षात सुमारे १ हजार अर्जदारांमध्ये समेट घडवून आणला आहे.

हेही वाचा – वसई : नायगावमध्ये जागेच्या वादातून गोळीबार, ६ जण जखमी

भरोसा कक्षाच्या भाईंदर विभागात २०२४ या वर्षात ७३१ अर्ज आले होते. त्यातील ४४८ प्रकरणात समेट धडवून आणण्यात यश आले आहे. आहे. जी प्रकरणी गंभीर स्वरूपाची होती अशा २५७ प्रकरणाना पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती भरोसा कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी सांगितले. वसई भरोसा कक्षाकडे २०२४ या वर्षात ६३९ अर्ज आले होते. त्यापैकी ४७९ प्रकरणात मसेट घडवूण आणला. १३५ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले तर २५ प्रकरणं सध्या प्रलंबित आहेत, अशी माहिती कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कोळी यांनी दिली.

हेही वाचा – भाईंदरच्या मलनि:सारण केंद्रात पडून एका कामगाराचा मृत्यू

या व्यतिरिक्त सायबर गुन्हे जनजागृती, लैंगिक धोक्यांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी जनजागृतीचे काम वसई भरोसा कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी शाळांमध्ये शिबिरे आणि कार्यशाळा भरविण्यात येत आहे. भाईंदरच्या भरोसा क्षाने मालदीवमध्ये अडककेलाल जिग्नेश पारेख याची भारतीय दूतावासातून सुखरूप सुटका केली. लहान मुलांध्ये लैंगिक अत्याचाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कायद्याचे धडे हा उपक्रम राबवून ४० शाळांध्ये ७५ व्याख्याने घेण्यात आली आणि सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिककास, व बाल संरक्षण हक्क आयोग आणि युनिसेफ यांच्यातर्फे देण्यात येणारा पहिला बालस्नेही पुरस्कार भाईंदर कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांना देण्यात आला.