वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई सातीवली खिंडीत केबल वाहतूक करणारा ट्रेलर उलटून अपघात घडला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास गुजरात वाहिनीवर ही घटना घडली यात चालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून केबल वाहिन्यांनी भरलेला सिजी ०४ एल आर ८३९९ या क्रमांकाचा ट्रेलर गुजरात वाहिनीवरून निघाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

वसई पूर्वेच्या सातीवली खिंडीत पोहचताच दुचाकीस्वार मध्ये आल्याने चालकाने तातडीने ब्रेक दाबला त्याच वेळी ट्रेलरचे नियंत्रण सुटून समोरील टेम्पो ला धडक लागून पलटी होऊन अपघात घडला. या घटनेची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून यात जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याशिवाय केबलचा माल व अपघात ग्रस्त वाहने मुख्य रस्त्याच्या मध्येच असल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे असे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai cable transport trailer overturned on mumbai ahemdabad national highway css