वसई – नालासोपार्‍यात राहणार्‍या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिच्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एका तरुणीसह दोघांवर पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनयिमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी १३ वर्षाची असून नालासोपारा पूर्वेला राहते. तिची ओळख सिमा मोर्या (२६) या तरुणीशी झाली होती. २०२३ मध्ये सिमाने या पीडित मुलीची सोनू सहानी (२४) याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर आरोपी सोनू सहानी पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला कळंब, राजोडी येथील विविध लॉजेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला यावेळी सोनू याने पीडितेची अश्लील छायाचित्रे काढून ती आरोपी सिमा मोर्या हिला पाठवले. सिमाने ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या मोबदल्यात तिच्याकडून २५ हजार ५०० रुपये उकळले. मात्र पैशांची मागणी वाढत होती तसेच आरोपी सोनू देखील तिच्यावर बलात्कार करत होता. हा प्रकार सहन न झाल्याने तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोंडी, वर्सोवा पुलापासून चिंचोटीपर्यंत वाहनांच्या रांगा

तक्रार प्राप्त होताच तुळींज पोलिसांनी याप्रकरणी सोनू सहानी आणि सिमा मोर्या या दोघांविरोधात बलात्काराचे कलम ३७६ (२)(एन) ३८४ तसेच बालकांचै लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम कलम ४, ८, १ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ई) ६७ (ए) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही आरोपी सोनू सहानी याला अटक केली आहे. त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा – बुलेट ट्रेनसाठी वैतरणा खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू

पीडित मुलीचे वय १३ वर्षे आहे. तरी देखील तिला लॉजमध्ये प्रवेश कसा दिला गेला याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपींनी यासाठी बनावट ओळखपत्र तयार केले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai crime news a 13 year old girl was raped on the basis of an obscene photograph in nalasopara and extortion of 25000 ssb