वसई- मुंबई अमहदाबाद महामार्गावजवळील सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यापूर्वीच गुन्हे शाखा २ च्या पथकाने मारेकर्‍यास ताब्यात घेतले आहे. एका तृतीयपंथियाने ही हत्या केल्याच संशय आहे.

मुंबई अमहदाबाद महामार्गाजवळ असलेल्या सातिवली गावाजवळ एक खिंड आहे. गुरूवारी दुपारी २ च्या सुमारास येथील झुडपात एक अर्धनग्न अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याचे वय ३० वर्षांच्या आसपास होते. त्याची ओळख पटेल अशी एकही वस्तू घटनास्थळी नव्हती. मयताची ओळख पटविण्याचे त्याचबरोबर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा- २ च्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत रुपा शेख नावाच्या तृतीयपंथीयाला या हत्या प्रकरणात संशयावरून ताब्यात घेतले आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

हेही वाचा – वसई : प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत चाफेकर यांचे निधन, कर्करोगाविरोधातील लढा ठरला अपयशी

हेही वाचा – गांधींना विरोध ही नथुराम गोडसेची प्रवृत्ती – थोरात

एका साडीमुळे मिळाला सुगावा..

घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. गुन्हे शाखा २ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता एक साडी तसेच वापरलेले काही कॉण्डम आढळले. त्यावरून पोलिसांच्या पथकाने या हत्येमागे तृतीयपंथी असल्याचा तर्क लावला. रात्रीच्या वेळी तृतीयपंथीय या परिसरात असतात आणि मयत तृतियपंथीयाकडे आलेला ग्राहक असू शकतो असा कयास पोलिसांनी लावला. रात्रीपासून पोलिसांनी शहरातील सर्व तृतियपंथीयांच्या वस्त्या, अड्डे यावर धाडी घातल्या. रुपा शेख नावाची तृतीयपंथीय या परिसरात व्यवसाय करत असते, याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. हत्या का करण्यात आली त्याचा तपास सुरू आहे. मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्याची छायाचित्रे परिसरात लावण्यात आली आहे. त्याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.